Ad will apear here
Next
‘सामान्य कार्यकर्ता देशाचा राष्ट्रपती’
रामनाथ कोविंद यांचा विजय साजरा करताना कार्यकर्ते.नागपूर : ‘पक्षाचा एक सामान्य कार्यकर्ता, ज्याने कोणत्याही अपेक्षेशिवाय संघटना वाढविण्यावर भर दिला, तो कार्यकर्ता ६५ टक्के जास्त मते घेऊन देशाच्या सर्वोच्च पदाची जबाबदारी सांभाळणार आहे. हा करिष्मा फक्त भाजपमध्येच होऊ शकतो,’ असे प्रतिपादन आमदार सुधाकर कोहळे यांनी केले.
 
रामनाथ कोविंद भारताचे १४वे राष्ट्रपती झाल्याबद्दल नागपूर महानगरात जल्लोष करण्यात आला. त्या वेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
 
या वेळी आमदार अनिल सोले, गिरीश व्यास, विकास कुंभारे, मिलिंद माने, महापौर नंदा जिचकार, डॉ. उपेंद्र कोठेकर, स्थायी समिती अध्यक्ष संदीप जाधव, सुभाष पारधी, जयप्रकाश गुप्ता, भोजराज डुंबे, प्रमोद पेंडके, माजी महापौर अर्चना देहनकर, शिवानी दाणी आदी मान्यवर उपस्थित होते.
 
शहरातील टिळक पुतळा महाल येथील कार्यालयासमोर ढोल-ताशे वाजविण्यात आले. या वेळी अर्चना देहनकर यांच्यासह अन्य महिलांनी फुगड्या घालून आनंद साजरा केला. कार्यकर्त्यांनी भाजपचा झेंडा फडकावत लाडूवाटप केले. यात दिलीप गौर, किशन गावंडे, संजय बंगाले, महेंद्र राऊत, चंदन गोस्वामी, रामभाऊ आंबुलकर, विकी कुकरेजा, देवेंद्र दस्तुरे, दयाशंकर तिवारी, गुड्डू त्रिवेदी, डॉ. कीर्तिदा अजमेरा, सीमा ढोमने, मनीषा काशीकर, चंद्रशेखर डोर्लीकर, किशोर पेठे, नरेश जुमानी, असलम खान, गजेंद्र पांडे यांच्यासह शेकडो महिला, पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन किशोर पालांदूरकर यांनी केले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/FZERBE
Similar Posts
भाजप अनुसूचित जाती मोर्चाची बैठक उत्साहात मुंबई : भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष यांची बैठक दादर येथील वसंत स्मृती भाजप कार्यालयात झाली. प्रदेशाध्यक्ष सुभाष पारधी या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. या वेळी भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे केंद्रीय महासचिव रमेशचंद्र रत्न यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, ‘अनुसूचित जाती मोर्चाच्या कार्यकर्त्यांना भारतरत्न डॉ
‘सीएम’च्या वाढदिवशी महामृत्युंजय जप नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरची सर्व प्रकारची विघ्ने टळावीत, यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने २१ जुलैला महामृत्युंजय जप व पूर्णाहुती यज्ञ करण्यात येणार आहे. पक्षाच्या वतीने प्रभागातील दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. याखेरीज विविध आघाड्यांच्या वतीने
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने वृक्षारोपण कामठी (नागपूर) : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने वृक्षलागवड, संगोपन व जनजागृती सप्ताहांतर्गत येथील कामगार कल्याण केंद्रामध्ये वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी चित्रप्रदर्शनही आयोजित करण्यात आले होते. कामठी येथील भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विवेक मंगताणी होते
‘भाऊसाहेबांच्या जाण्याने शेतकऱ्यांचे नुकसान’ नागपूर : ‘भाऊसाहेब फुंडकर यांच्या जाण्याने केवळ भाजपचेच नव्हे, तर राज्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे,’ असे विचार विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language